सांस्कृतिक दल संगीत गायन अभिनय लोककला कारागिरी इत्यादी अनेक गुण या मुलांमध्ये उपजत आहेत भटके समाजातील मुलांनी शाळेत रमावे त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून या दलाची निर्मिती झाली प्रकल्पातील अनेक मुले खूप सुंदर अभिनय करतात बालविवाह अंधश्रद्धा जातीयता स्त्रीभ्रूणहत्या इत्यादी विषयांवर प्रकल्पातील विद्यार्थी पथनाट्य सादर करतात परिसरातील विविध उत्सवांमध्ये येथील विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतात कार्यक्रमाच्या रचनेपासून सूत्रसंचालना पर्यंतची सर्व कामे कुशलतेने करतात.